नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या (Crude Oil) भावाचा भडका उडाला आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. देशांतील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी होती. त्यामुळे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर आहेत. नुकतीच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. यानंतर आता पेट्रोल, डिझेलसह एलपीजी गॅसच्या दरवाढीचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
खनिज तेलाच्या भावाचा भडका आणि केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्याने सीएनजी सातत्याने महागताना दिसत आहे. रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचला आहे. खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाल्याने सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर एक रुपयाने वाढवण्यात आला आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो 57.51 रुपयांवर गेला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर 59.58 रुपयांवर पोचला आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर आहेत. सीएनजीचा दरात वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर असेल, अशी शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकता या चार प्रमुख महानगरांत आज दरात बदल करण्यात आलेले नाहीत.
महानरांतील आजचे दर (प्रतिलिटर)
शहर पेट्रोल डिझेल
दिल्ली 95.41 86.67
मुंबई 109.98 94.14
चेन्नई 101.40 91.43
कोलकता 104.67 89.79
पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 130 डॉलरवर गेला आहे. ही भावाची मागील 14 वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही विधानसभा निवडणुकांमुळे हे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशात सध्या महागाईचा भडका उडाल्याने मागील वर्षी मोदी सरकारने (Modi Government) पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका (Assembly Elections) असल्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. या निवडणुका संपल्या असून, या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडण्याचा अंदाज आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर 12 ते 25 रुपये वाढण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.