BMC Covid Scam : मुंबई महापालिकेतील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजीव जैस्वाल यांची ईडी चौकशी सुरु आहे. त्यांच्या पाठोपाठ आता मुंबई महापालिकेतील आणखी दोन अधिकाऱ्यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जैस्वाल यांच्या पाठोपाठ आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू हेदेखील ईडीच्या रडारवर आले आहेत.
मुंबईतील जंबो कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्याचे कंत्राट लाईफ लाईन कंपनीला देण्यात आले होते.पण हे कंत्राट देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आल्याचा आरोप करण्यात आला.या प्रकरणी मुंबई पालिकेचे (BMC) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे विद्यमान उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्या कार्यालयात ईडीने छापेमारी केली, या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड लागल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
कोविड काळातील बहुतांश निर्णय महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या मंजूरीने घेण्यात आले होते. तर त्यांच्या संबंधीचे जे काही व्यवहार झाले ते महापालिकेच्या खरेदी खाते विभागाकडून करण्यात आले. महापालिकेच्या खरेदी खात्याची सूत्रे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे आहेत. जैस्वाल यांच्यानंतर आता आयुक्त इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. (BMC Covid Scam)
काय आहे प्रकरण?
मुंबई महापालिकेच्या जंबो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचे गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची कॅगमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली होती. पण साथरोग नियंत्रण कायद्यान्वये हा खर्च केल्याचे सांगून लेखापरीक्षण करता येणार नाही, असे सांगत आयुक्त इक्बाल चहल यांनी चौकशीला विरोध केला. त्यानंतर 'ईडी'ने (ED) या प्रकरणाची दखल घेत आयुक्त चहल यांची चौकशी केली.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.