Nagpur Politics : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवासंपसून पक्षाच्या बैठकांपासून, नव्या नियुक्त्यांही केल्या जात आहेत.नुकतीच राष्ट्रवादीने राष्ट्रीय कार्यध्यक्षांचीही निवड केली.
याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या सूचनेनंतर राष्ट्रवादीचे आता देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातही लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आगामी महानगरपालिका,लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने 'वन बुथ टेन युथ'च्या फॅार्म्युल्यानुसार नागपूरमध्ये पक्षबांधणी सुरु केली आहे.
या फॉर्म्युल्यानुसार एका बुथवर १० तरुणांची टिम तयार करण्याचं नियोजन राष्ट्रवादीकडून करण्यात आलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत २५० बुथवर अशी टीम तयार करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे आघाडीत काँग्रेसकडे असलेल्या जागांवरंही राष्ट्रवादीने निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे पेठे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) आरोपांनाही कालच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं."२०१४ सालची निवडणुकनंतर भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका मी घेतली होती. त्यानंतर द्यायची वेळ आली नाही. मात्र तो पाठिंबा देण्यामागं आमचं काही कारणं होतं.'
यानंतर आमच्यात अनेक गोष्टींवर चर्हीचा झाली.पण काल त्यांनी स्वतःच सांगितलं की मी दोन दिवसांनी धोरण बदललं. मग दोन दिवसांनी शपथ घायचं काय कारण होतं आणि तीही चोरून पहाटे घेण्याचं काय कारण होतं? असा सवाल करत शरद पवारांनी उपस्थित केला होता.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.