Praful Patel On NDA Meeting : Sarkarnama
मुंबई

Praful Patel News : दिल्लीतील बैठकीनंतर प्रफुल पटेल म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस आता NDA चा अविभाज्य घटक.."

Praful Patel On NDA Meeting : "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएबरोबर काम करेल.."

सरकारनामा ब्यूरो

NDA Meeting News : भाजप विरोधक पक्षांची काल (ता.9 जुलै) कर्नाटकाच्या राजधानी बंगळुरुमध्ये बैठक पार पडली. भाजप विरोधी पक्षांचा हा मेळा भरलेला असतानाच, भाजपप्रणित एनडीएने देखील राजधनी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. (Latest Marathi News)

एनडीएच्या या बैठकीत एकूण ३८ पक्ष सामील झाले होते. एनडीएच्या या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे नेते बैठकीला उपस्थित राहिले होते.

दरम्यान, एनडीएचा घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) उपस्थित राहिल्यानंतर एनडीएच्या बैठकीनंतर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची वैयक्तिक भेट घेतली. या बैठकीत चारही नेत्यांनी बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा केली. यामुळे चर्चांना उधाण आले होते.

या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पटेल म्हणाले, "एनडीएच्या बैठकीसाठी नेते अजित पवार आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उपस्थित होतो. यावेळी देशभरातील ३८ पक्ष सहभागी झाले होते. 'एनडीए'ला 25 पंचवीस वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने हि बैठक आयोजित केले होते.ठ

"आमचा पक्ष पहिल्यांदाच एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांनी यावेळी पक्षाची भूमिका मांडली. आता आमचा पक्ष एनडीएचा एक अविभाज्य भाग आहोत. यापुढे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) एनडीएबरोबर काम करेल, असेही पटेल म्हणाले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT