Devendra Fadanvis 
मुंबई

राज्यसभेच्या विजयानंतर फडणवीसांनी दिला विधानपरिषदेच्या यशाचा कानमंत्र

Rajyasabha election 2022| Devendra Fadanvis| किमान आता तरी मुख्यमंत्र्यानी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. असा सल्लाही फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Devendra Fadnavis latest news

मुंबई : राज्यसभा निवडणुकीतील भाजपच्या (BJP) विजयाने आनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. किमान आता तरी मुख्यमंत्र्यानी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. असा सल्लाही फडणवीसांनी शिवसेनेला दिला आहे.

मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपने आज (११ जून) राज्यसभा निवडणुकीतील विजयाचा विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ''भाजपचा विजय हा आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करायला पाहिजे. आजारपणातही त्यांनी केलेल्या मतदानामुळे आपली तिसरी जागा निवडून आली. पण आपण जिंकलो असलो तरी त्याचा उन्माद करायचा नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील इतर निवडणुकांमध्ये आपल्याला मोठा विजय मिळवायचा आहे, असे आवाहनही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले.

राज्यसभेच्या या पराभवानंतर आतातरी महाविकास आघाडीने, मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे. महाराष्ट्रतला विकास थांबला आहे. आम्हांला विरोध करायचा म्हणून महाराष्ट्रातले आमचे प्रकल्पही बंद पाडले. त्यामुळे राज्याचं अतोनात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकरी अडचणीत आहे. राज्य सरकारने विकासाची किमान दोन तरी कामं दाखवावीत, असे आव्हानही फडणवीस महाविकास आघाडीला दिलं आहे.

इतकचं नव्हे तर, १० दिवसांवर असलेल्या विधान परिषदेच्या निवडणूकांसाठीही भाजप सज्ज असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले आहेत. फडणवीस यांनी आगामी विधान परिषदेसाठी भाजप सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत दिले. भाजप विधान परिषदेची जागा लढवत असली तरी ही निवडणूक सोपी नाही. विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेपेक्षाही अधिक लोकांची सदसद्‌बुद्धि जागृत असेल, असंही फडणवीस यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT