Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ठाकरे गटाचा कल्याणवर डोळा? श्रीकांत शिंदेंना 'असा' देणार शह

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनंतर पंधरा दिवसातच संजय राऊत डोंबिवलीच्या दौऱ्यावर

Bhagyashree Pradhan

Kalyan Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरे गटाचे सर्व प्रयत्न सुरू झालेले आहेत. लोकसभेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठीच दोन आठवड्यातच खासदार संजय राऊत पुन्हा डोंबिवलीत येणार आहेत.

उद्धव ठाकरेंनी पंधरा दिवसांपूर्वी डोंबिवलीचा दौरा केला होता. त्यानंतर ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलेला पाहिला मिळाला. त्यानंतर पुन्हा काही शाखांचे उदघाटन करण्यासाठी खासदार संजय राऊत आता पुन्हा डोंबिवलीत येणार आहेत. आता होणाऱ्या सभेत ते नेमके काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी तीन शाखांचे उदघाटन

डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काही शाखांचे नव्याने उद्घाटन करण्यात आले होते. आता पुन्हा तीन शाखेचे उद्घाटन होणार आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत डोंबिलीत येणार आहेत. डोंबिवली पश्चिम येथील उमेश नगा, जुना डोंबिवली आणि कोपर येथे या तीन शाखा नव्याने सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

कलारंग स्पर्धेचे बक्षीस वाटप

उद्धव ठाकरे गटाकडून कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सहभागी झालेल्या आणि बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक खासदार संजय राऊत यांच्या हस्ते होईल, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

सभेचे आयोजन

खासदार संजय राऊत यावेळी सभा घेणार आहेत. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ते या सभेत नेमके कोणाला लक्ष्य करणार आणि काय बोलणार याची उत्सुकता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेपूर्वी ठाकरे गट सक्रिय

कल्याण डोंबिवलीमध्ये आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी चांगलीच सहनभुती मिळवलेली पाहिला मिळाली. ढोल ताशाच्या गजरात स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले होते. यावेळी ज्यांनी सगळ्या शाखा तोडल्या त्यांचे निवडणुकीत मी कंबरडं मोडणार, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनतर ठाकरे गट अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT