Abdul Sattar|
Abdul Sattar|  
मुंबई

सत्तारांच्या घरावर आंदोलन; विद्या चव्हाणांसह राष्ट्रवादीच्या १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

सरकारनामा ब्युरो

NCP - Abdul Sattar| मुंबई : शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी गलिच्छ भाषेत टीका केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक पवित्रा घेत मोठे आंदोलन उभे केले.

सत्तारांच्या मुंबईतील पन्हाळगड या शासकीय निवासस्थानावर दगडफेक केली. यात अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील घराच्या काचा फोडल्या. या प्रकरणी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यासह आदिती नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह १५ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी सत्तार यांच्या घरावरे दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर मुंबईतील कफ परेड पोलिस ठाण्यात गुन्हेगारी कायद्यांतर्गत, आणि मालमत्तेस नुकसान प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?

सिल्लोड येथे एका वृत्तवाहिनीशी बोलतांना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळेंना तुम्ही खोके देण्याची ऑफर केली होती. त्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं, यावर काय सांगाल असं सत्तार यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. या वर बोलताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकार# # झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.

तर, महाराष्ट्रातील मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना अशोभनीय वर्तन आहे. आम्ही सावित्रीबाईंच्या, जिजाऊंच्या लेकी आहोत. सुसंस्कृत महाराष्ट्र आम्ही पाहिलाय. त्यांच्या घराची काच काय, अब्दुल सत्तार सापडला असता तर त्याचंही डोकं फोडलं असतं, एवढा कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे, त्यांना बोलताना शरम नाही वाटली का? असा संताप विद्या चव्हाण यांनी व्यक्त केला. या माणसाला शरम नाही. अब्दुल सत्तारसारख्या मंत्र्यांने राजीनामा दिला पाहिजे. असा हल्लाबोल विद्या चव्हाण यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT