Mumbai | Roshan Irfan Shaikh Caste Certificate Cancelled Sarkarnama
मुंबई

Mumbai BJP : मुंबई महापालिकेत भाजपला लॉटरी! आणखी एक नगरसेवक वाढणार; 'या' पक्षाला मोठा धक्का

AIMIM Corporator Caste Certificate Cancelled : यापूर्वीही दोन अपात्रतेच्या प्रकरणांत दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. एकूण अपात्र तीन नगरसेवक, पैकी 1 ठाकरेंची शिवसेना आणि 2 MIM चे नगरसेवक बाद झाले आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 10 Jul : मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एआयएमआयएमच्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणी दरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले.

या निर्णयामुळे शेख यांचे नगरसेवक पद जाण्याची शक्यता निर्माण झाली असताना आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तर जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रोशन शेख यांचे नगरसेवकपद गेले आहे. परिणामी एआयएमसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल आठ नगरसेवक निवडून आलेल्या एमआयएमला हा मोठा फटका असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे भाजपला तिसऱ्यांदा लॉटरी लागण्याची शक्यात निर्माण झाली असून भाजपचाच आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. प्रभाग 138 मधील AIMIM चे नगरसेवक रोशन शेख यांचे सदस्यत्व जात रद्द होत प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे नगरसेवकपद गेले आहे. त्यामुळे या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही दोन अपात्रतेच्या प्रकरणांत दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद आणखी वाढणार आहे.

एकूण अपात्र तीन नगरसेवक, पैकी 1 ठाकरेंची शिवसेना आणि 2 MIM चे नगरसेवक बाद झाले आहेत.आज सभागृहात तिसऱ्या नगरसेवकाच्या अपात्रतेची घोषणा होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकं काय होत, याकडे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रोशन शेख या प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आल्या होत्या. मानखुर्द – शिवाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे परभणी येथील जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 138 ‘इतर मागासवर्गीय’ (ओबीसी) प्रवर्गासाठी राखीव होता. या प्रभागातून रोशन शेख यांनी 2026 च्या महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता.

त्यानंतर त्यांनी जुलाह (इतर मागासवर्ग) जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी परभणीच्या जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते. निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले समाजवादी पक्षाचे (सपा) उमेदवार मोहम्मद महफूज शेख यांनी रोशन शेख यांच्या जात प्रमाणपत्राला आव्हान दिले होते.

त्यामुळे हे प्रकरण परभणी येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आलेले होते. तेथील समितीने हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले आहे. त्यामुळे आता एमआयएमसह नगरसेविकेला मोठा धक्का बसल्याचं बोललं जातंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT