Rajan Patil, Jayant Patil, Ajit Pawar
Rajan Patil, Jayant Patil, Ajit Pawar sarkarnama
मुंबई

अजितदादांसह तीन नेत्यांनी समजाविले... आता तरी राजन पाटील राष्ट्रवादीत राहणार?

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पाटील यांनी भेट घेतली.

मुंबई येथे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, यांनी राजन पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार यशवंत मानेही उपस्थित होते.

या बैठकीत सोलापूर जिल्ह्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याकडे देण्यात आली. तर मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्याकडेच देण्यात आली आहे. तसेच इतरांनी त्यामध्ये लुडबुड बंद करावी, असेही सांगण्यात आले आहे.

या बैठकीमुळे सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यात मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या राजकीय वादंगावार पडदा पडल्याचे सांगितले जात आहे. सोलापूर जिल्ह्याची सर्वस्वी जबाबदारी तसेच आगामी निवडणुकांमध्ये सर्व निर्णय हे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हेच घेणार आहेत. तसेच मोहोळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्याकडेच राहतील असे ठरले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेला कलह थांबणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT