Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : पुन्हा सत्तेत आलेल्या अजित पवारांचा वाढदिवस होणार जोमात ; आठवडाभर चालणार 'अजितोत्सव'

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरले आहेत. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजितदादांसह आमदारांचा मोठा गट थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये दाखल झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री अजितदादांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'अजित उत्सव' सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

प्रशासनावरील वचक, स्पष्टवक्तेपणा, रोखठोक स्वभाव कायमच रांगड्या व अस्सल ग्रामीण भाषणशैलीमुळे अजित पवार(Ajit Pawar) हे नेहमीच चर्चेत असतात. तसेच राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नेत्यांशीही सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्याच अजित पवारांचा २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. दरवर्षी अजित पवारांचा वाढदिवस राष्ट्रवादी(NCP)च्या कार्यकर्त्यांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यांच्यावर राजकीय वर्तुळासह सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव केला जातो.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे(Sunil Tatkare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा केली आहे. तटकरे म्हणाले, अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून राष्ट्रवादीच्या वतीनं 'अजित उत्सव' नावाने सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे.

अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा हा स्थायीभाव असून काहींना तो आवडत नसेल तरी महाराष्ट्राला तो रुचला आहे. रक्तदान शिबिर, पावसाळ्यामुळे छत्र्या वाटप, वृक्ष लागवड, शालेय साहित्य, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, ग्रामस्वच्छता असे सामाजिक उपक्रम २२ ते ३१ दरम्यान राबवणार असल्याचेही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT