AJit Pawar News  Sarkarnama
मुंबई

AJit Pawar News : अजित पवारांच्या हाती 'धनुष्यबाण' ; निशाणा कुणावर?

AJit Pawar On Dhanushban : 'अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे, महिला आघाडीची एकमुखी मागणी..'

Jui Jadhav

Mumbai News : मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला आघाडीच्या मेळाव्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात धनुष्यबाणाची प्रतिकृती देण्यात आल्याने, यावर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. मेळाव्यातील या कृतीला आता राजकीय संदर्भ असल्याचेही चर्चा होत आहे. शिवसेना कुणाची? याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे, असा निर्णय दिला. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना धनुष्यबाण प्रतिकृती भेट देणे, याला राजकीय अर्थ असल्याचेही बोलले जाते. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवारांच्या हाती देण्यात आला धनुष्यबाण -

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अदित पवार) आज मुंबई मध्ये झालेल्या महिलामेळाव्यात उपमुख्यमंत्री अदित पवार सहभागी झाले. या मेळाव्यानिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यातील महिलांनी त्यांचा सत्कार केला. मात्र, यावेळी एका प्रसंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अजित पवारांचा सत्कार सोहळा सुरु असताना त्यांना धनुष्यबाणाची प्रतिकृती देण्यात आली. अजित पवारांनीही हा धनुष्यबाण वर उंचावला.

अजित पवार यांचा सत्कार राज्यातील विविध भागातून आलेल्या महिलांनी केला. विविध भागातील प्रसिद्ध वस्तू आणि टोप्या देऊन त्यांचा सत्कार केला गेला. जवळपास 10-12 प्रकारचे टोप्या देऊन अजित पवारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईत मोठं शक्तिप्रदर्शन महिला आघाडीकडून करण्यात आलं. रुपाली चाकणकर यांनी या मेळाव्याचे आयोजन केलं होत. विशेष करून राष्ट्रवादीच्या महिला अजित पवारांच्या मागे ठाम पणे उभ्या आहेत, असंच या मेळाव्यातून दाखवायचे असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्धार -

मुंबईत झालेल्या महिला मेळाव्यात अजित पवारांना मुख्यमंत्री करायचा नारा दिला. राज्यातील विविध भागातून मेळाव्यासाठी उपस्थित होत्या. प्रत्येक महिलेला टोपी देखील देण्यात आली होती. मात्र या टोपीवर 'एकच वादा भावी, मुख्यमंत्री अजितदादा' लिहल्याचे दिसून आले. भाषण करताना रूपाली चाकणकर यांनी देखील अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचं असल्याचा नारा दिला. केवळ रूपाली चाकणकर नाही, तर इतरही नेते अजित पवारांना मुख्यमंत्रीपदी बघण्याची इच्छा नेहमीच व्यक्त करतात. मात्र आज अजित पवारांच्या हातामध्ये धनुष्यबाण दिल्याने याची वेगळीच चर्चा सुरु झाली.

घड्याळ तेच, वेळ नवी -

राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवार यांनी दावा केला की, राष्ट्रवादी मूळ हा पक्ष आमचाच आहे. मात्र दुसरीकडे 'घड्याळ तेच, वेळ नवी' हा देखील नारा देण्यात आला. घड्याळ जरी तेच असलं तरी वेळ आमची नवीन आहे, असा दावा वारंवार राष्ट्रवादी नेत्यांकडून केला जातो. राष्ट्रवादीकडून प्रत्येक कार्यक्रमांमध्ये हा नारा दिला जातो आणि त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये हीच घोषणा दिली जाते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT