Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Gat : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांची मोर्चेबांधणी; कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Ajit Pawar Group Melava Kalyan : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने निवडणुकीसाठी कंबर कसली...

सरकारनामा ब्यूरो

भाग्यश्री प्रधान-आचार्य -

Maharashtra Politics Latest News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीसाठी सरसावले आहेत. सध्या राष्ट्रवादीत शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना आपले वर्चस्व सर्वच जिल्ह्यांमध्ये दाखवावे लागणार आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यात सध्या शिंदे गटाचे आणि भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वर्चस्व पाहिला मिळत आहे. त्यामुळे सध्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या ठाणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आपले कार्यकर्ते तयार करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी Ajit Pawar गटाने कल्याण तालुक्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.

चांगले कार्यकर्ते मिळविण्याची धडपड

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातही शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर आहेत. त्यामुळे त्या विभागात त्यांची ताकद अधिक दिसून येते.

कल्याण पूर्वमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि डोंबिवली येथे भाजपचे आमदार आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे वर्चस्व आहे. पक्ष हा चांगल्या कार्यकर्त्यांवर उभा राहतो हे साधारण राजकीय समीकरण आहे. त्यामुळे संपूर्ण कल्याण तालुक्यात अजित पवारांना उभे राहायचे असेल तर चांगले कार्यकर्ते जमविणे गरजेचे आहे. त्यामुळे हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच कल्याणमध्ये येणार

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा खांद्यावर आल्यानंतर कल्याण तालुक्यात अजित पवार पहिल्यांदाच जाणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार समवेतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, आमदार दौलत दरोडा, युवा नेते पार्थ पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब मुल्ला उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

वरप गावात होणार मेळावा...

रविवारी सकाळी 10 वाजता कल्याण मुरबाड मार्गावरील वरप गावात हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा होणार असल्याची माहिती आनंद परांजपे यांनी दिली. आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी आणि ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरेल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली पाहिला मिळत आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT