Ajit Pawar, Jitendra Awhad, Yashomati Thakur, Suhas Kande
Ajit Pawar, Jitendra Awhad, Yashomati Thakur, Suhas Kande sarkarnama
मुंबई

अजितदादांना धास्ती होतीच! अमित शहांचा दाखला देऊनही आव्हाड चुकले?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha election) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) आमदारांनी केलेल्या मतदानावर भाजपने (BJP) आक्षेप घेतला आहे. यामुळे मतमोजणीला उशीर होत आहे. निवडणुकीत मतदान कसे करायचे याचे महाविकास आघाडीने मार्गदर्शन शिबीर घेतले होते, तरीही बॅकफुटवर जाण्याची वेळ आली आहे.

मतदान करत असताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी पोलिंग बुथवर बसलेल्या पोलिंग एजंटच्या हातात मतदान केलीली पत्रिका दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी नाना पटोले, जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जयंत पाटील तर सुहास कांदे यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या हातात मतदान केलेली पत्रिका दिल्याचा आरोप करत भाजपने आक्षेप घेतला आहे.

यावर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ आयोगाने मागवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांना मार्गदर्शन केले होते. आता मतदान महत्वाचे, नियमानुसार मतदान करावे, असे त्यांनी सांगितले होते. तसेच अती उत्साह दाखवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखा प्रकार करु नका, असेही अजित पवारांनी आमदारांना सांगितले होते. गुजरातच्या निवडणुकीसारखी मतपत्रिका बाद होऊ देवू नका, अशा सूचना पवार यांनी केल्या होत्या.

मात्र, त्यानंतर देखली आघाडीच्या आमदारांनी मतदान करताना चूक केल्याचा आक्षेप भाजपने केला आहे. भाजपचे आमदार पराग आळवणी यांनी आक्षेप घेतला. मतपत्रिका दाखवायची असते ती हाताळायला द्यायची नसते. भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड व सुहास कांदे यांनी पोलिंग एजंटला मतदान केल्यानंतर मतपत्रिका दाखवण्याऐवजी हाताळायला दिली. ही पद्धत चुकीची आहे. ही तिन्ही मते बाद व्हावीत.

जितेंद्र आव्हाड म्हणाले

जितेंद्र आव्हाड म्हणाले, यांच्या डोळ्याला थ्रीडी कॅमेरा लावला आहे का. मी कुणाला उत्तर द्यायला बांधिल नाही आहे. हे लोकं घाबरले आहे, बावचळले आहे. हे प्रकार बालिश आहे. मला नियम माहित आहे. आम्ही कसे महान आहोत, हे दाखवण्याचा हा प्रकार आहे. मी काय केले हे का सांगू असंही ते म्हणाले. मी या आक्षेपांकडे लक्ष देत नाही, असेही आव्हाड म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT