Ajit Pawar Joins Shivsena-BJP Government  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजितदादा; आता '33 टक्के एकदम ओके'

Ajit Pawar Joins Shivsena-BJP Government : अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

सरकारनामा ब्यूरो

Political News: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अजून काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह नऊ जण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले. एवढंच नाही तर आज मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. तर याआधी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपबरोबर जात राज्यात सरकार स्थापन केलं.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे नऊ आणि भाजपचे नऊ असे मंत्री आहेत. तर आता अजित पवारांसह सरकारमध्ये सामिल झालेल्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात आता एकूण 27 मंत्री झाले आहेत. अर्थात शिंदे गट, भाजप आणि अजित पवार असा प्रत्येकी 33 टक्के वाटा मंत्रिमंडळात झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात '33 टक्के एकदम ओके' अशा टॅगलाईनने चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केले, त्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग गाजला होता. 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल...एकदम ओके'हा शहाजी बापू पाटलांचा डायलॉग गाजला. शिंदेनंतर आता अजित पवारांसह नऊ जणांनी बंड करत सरकारमध्ये सामिल होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये तीनही पक्षाचा वाटा हा'33 टक्के एकदम ओके' असाच झाला आहे. यावरून '33 टक्के एकदम ओके'अशा चर्चा आता रंगल्या आहेत.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT