NCP News: अजितदादा पवार यांनी महायुतीत सामील झाल्यानंतर 40 ते 42 आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत वारे फिरल्यापासून अजितदादांच्या पक्षातील नेते पुन्हा शरद पवार यांच्याकडे माघारी परतत आहे. अलीकडेच फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता अजितदादांना पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.
सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे ( Rajendra Shingane ) हे ‘तुतारी’ हाती घेणार आहेत. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शिंगणे यांनी हा निर्णय घेतला आहे.
जिल्हा बँक वाचविण्यासाठी राजेंद्र शिंगणे यांनी अजितदादांसोबत गेल्याचा दावा केला होता. राजेंद्र शिंगणे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्याकडून पुतणी गायत्री शिंगणे यांना सिंदखेड राजा मतदारसंघातून पाठबळ देण्यात आले होते. गायत्री शिंगणे काका राजेंद्र शिंगणे यांच्याविरुद्ध लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, आता राजेंद्र शिंगणे पुन्हा स्वगृही परतत आहेत. शिंगणे यांना पुन्हा तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गायत्री शिंगणे कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अमोल मिटकरींनी केलेली शिंगणेंवर टीका
अलीकडे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राजेंद्र शिंगणे यांच्यावर टीका केली होती. मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिंगणे यांना वितरित करण्यात आलेल्या निधीची रक्कम नमूद करण्यात आली होती. त्यानुसार सत्तेत सामील झाल्यापासून शिंगणे यांना एकूण 1 हजार 884.61 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.