Maharashtra Political Crisis | Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Political Crisis: अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी अजित पवारांना हवेत 36 आमदार

Maharashtra Politics: वर्षभरानंतर राज्याच्या राजकारणात नवा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आश्चर्यकारकरित्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अनुराधा धावडे

वर्षभरानंतर राज्याच्या राजकारणात नवा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आश्चर्यकारकरित्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेतेही यावेळी अजित पवार यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमाणेच अजित पवार यांच्यासोबतही राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. अजित पवार यांच्यासोबत ३० ते ४० आमदार असल्याचं सांगितले जाते. पण दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून अजित पवार यांच्यावर अपत्रातेची कारवाई करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, अजित पवार आणि आमदार अपात्र ठरू नये यासाठी दोन तृतीयांश आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे एकूण ५३ आमदार आहेत. यातील किमान ३६ आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, सध्या अजित पवार यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. (NCP Crisis)

विधानसभेत राष्ट्रवादीचे एकूण ५३ आमदार आहेत. त्यातील ३६ आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्यास दोन तृतीयांश संख्याबळ पूर्ण होऊ शकते. सध्या ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत सध्या आमदार असून पूढे हे संख्याबळ वाढू शकते , अशीही शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड , रोहित पवार , प्राजक्त तनपुरे , अनिल देशमुख, सुमन पाटील, राजेश टोपे हे नेते आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत.

याशिवाय राष्ट्रवादीचे विधान परिषदेच्या तीन- चार आमदारांचा अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठिंबा आहे. विधान परिषदेच्याही सध्या २१ जागा रिक्त आहेत. विधानपरिषदेतील ५७ पैकी भाजपचे २२ आमदार आहेत. राष्ट्रवादी व शिवसेनेतील बंडखोर आणि अपक्षांच्या मदतीने ३० चे संख्याबळ होते. यामुळे पावसाळी अधिवेशनात सभापतीपदाची निवडणूक होऊ शकते. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे . यामुळे त्यांच्याच नावाची सभापतीपदासाठी चर्चा असल्याचेही सांगितले जात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT