Ajit Pawar News :  Amit Shah
Ajit Pawar News : Amit Shah  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : 'अजित पवार मुख्यमंत्री होणारच..'; अमित शाहांचा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा !

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चांना उधाण आले होते. तशा आशयाचे होर्डिंग्ज् काही ठिकाणी लागले होते. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठे विधान केले आहे.

अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच. वेट अँड वॉच… असा ठाम दावा मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्याचं राजकारण सांभाळेल, असा नेता महाराष्ट्रात अजित पवारांशिवाय दुसरा कुणी केला आहे. हे केंद्रीय गृहमंत्री यांनी स्वत:च कबुल केलं आहे, असंही सांगायला मिटकरी विसरले नाहीत. बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना, त्यांनी हा दावा केला आहे.

अमोल मिटकरी यावेळी म्हणाले, "सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्याचं राजकारण सांभाळता येईल, असा अजित पवार यांच्यासारखा दुसरा तोलामोलाचा नेता महाराष्ट्रात नाही, हे दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच कबुल केलं आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच आहेत. वेट अँड वॉच."

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता सक्तीच्या रजेवर गेलेत, याचा माझ्या वक्तव्याशी संबंध जोडू नका," असेही ते सांगायला विसरले नाही. “राज्यात महाविकास आघाडी सरकार येत आहे. अजित पवार आता मुख्यमंत्री पदावर दिसतील,” असं मोठं विधान मिटकरींनी केले. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT