ajit pawar  sarkarnama
मुंबई

Ajit Pawar: पक्षातील ‘आउटगोइंग’वर प्रश्न, अजितदादा चिडले अन् हिंदीतून फाडफाड बोलून गेले

NCP MLAs Returning to Sharad Pawar: अजितदादांनी महायुतीला साथ देताना अनेक आमदारांनी शरद पवारसाहेबांची साथ सोडली. मात्र, आता वारे उलटे वाहत असून आमदार पुन्हा अजितदादांची साथ सोडून साहेबांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी 'वेटिंग'वर आहेत.

Akshay Sabale

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गळती लागली आहे. महायुतीसोबत सत्तेत गेलेले अनेक आमदार अजितदादांची साथ सोडून शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यापार्श्वभूमीवर अनेकांनी शरद पवारसाहेबांची भेट घेतली असून काहीजण ‘वेटिंग’वर आहेत. याबद्दल प्रश्न विचारल्यावर अजितदादा चांगलेच चिडल्याचं पाहायला मिळाले.

महायुती सरकारनं आपल्या अडीच वर्षांचं ‘रिपोर्ट कार्ड’ सादर केलं. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित होते. यावेळी अजितदादांच्या पक्षातून सुरू असलेल्या ‘आउटगोइंग’वर हिंदीतून प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, अजितदादांनीही हिंदीतून उत्तर देत म्हटलं, ‘आप फिकर मत करो. मैं खंबीर हूं.’

आपके पार्टीके एक-एक विधायक कम होते जा रहे हैं. अतुल बेनके पवारसाहबसे मिले हैं. शिंदे ( बबनदादा शिंदे ) भी पार्टी छोड रहे हैं. इसकी वजय क्या हैं. यावर अजितदादांनी म्हटलं  ( Ajit Pawar ), “आप फिकर मत करो. मैं खंबीर हूं. आप सब झूट बोल रहे हैं. अतुल बेनके वहा गया नहीं. किसने कहा बेनके गया हैं.” ( तुम्ही काळजी करू नका. मी खंबीर आहे. तुम्ही सगळे खोटे बोलत आहात. अतुल बेनके तिकडे गेले नाहीत. कुणी म्हटलं, अतुल बेनके भेटायला गेले होते? )

“मेरे पार्टी मे से तिकीट नही मिलता, इसलिये वो वहा जा रहे हैं. और जिसको तिकीट देने वाला हूं, वो मेरे साथ रहे हैं,” असं अजितदादांनी म्हटलं.  ( ज्यांना माझ्या पक्षातून तिकीट मिळणार नाही, ते तिकडे चालले आहेत. ज्यांना तिकीट देणार आहे, ते माझ्यासोबत आहेत. )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT