Investigators from AAIB examine the crash site of Learjet 45 (VT-SSK) in Baramati as black box data recovery efforts continue in the Ajit Pawar plane crash investigation. Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Plane Crash : 'विमानातील दोन्ही रेकॉर्डरचं नुकसानच, पण...', अजित पवारांच्या अपघात तपासावर केंद्र सरकारचं पहिल्यांदाच अधिकृत निवेदन

AAIB Black Box Report : अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी सुरूवातीपासूनच अनेकांनी हा अपगात नव्हे तर की घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशातच आता बारामती येथे झालेल्या विमानाच्या अपघाताचा तपास करत असलेल्या विमान अपघात तपास ब्युरोने (AAIB) एक निवेदन जारी करत अधिकृत माहिती दिली आहे.

Jagdish Patil

Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक वेगवेगळ्या शंका-कुशंका घेतल्या जात आहेत. खुद्द अजित पवारांचे पुतणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

एका बाजूला या चर्चा सुरू असताना विमानातील तांत्रिक अडचणींची माहिती देणारे डिजीटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे दोन्ही रेकॉर्डर डॅमेज झाले असल्याची माहिती आहे. विमान अपघात तपास ब्युरो या अपघाताचा तपास करत आहे, या तपासाच्या अपडेटबाबत केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने निवेदन जारी करत अधिकृत माहिती दिली आहे.

पीआयबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या लिअरजेट ४५ (VT-SSK) या विमानाच्या अपघाताची सविस्तर चौकशी करत आहे. आगीमुळे आणि उष्णतेमुळे विमानातील दोन्ही रेकॉर्डर्स डॅमेज झाले आहेत. बराच वेळ आगीत जळाल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे.

यातील एल ३-कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) एएआयबी फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. पण हनीवेल कंपनीद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) अपघातादरम्यान जास्तवेळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात असल्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे.

हनीवेल कंपनीनिर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ची सविस्तर तपासणी सुरू आहे. डेटा डाऊनलोड करण्यासाठी संबंधित कंपनीच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधीकडून मदत मागितली गेली आहे. शिवाय पुराव्यावर आधारित तपास करण्यासाठी एएआयबी सर्व प्रोटोकॉलचे काळजीपूर्वक पालन करत आहे. ब्युरो पारदर्शकतेसाठी पूर्णपणे वचनबद्ध असून आम्ही पुढील माहिती मिळवत आहोत, असं एएआयबी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT