Political leaders address media after the Ajit Pawar plane crash, raising concerns over the black box damage and demanding an independent investigation. Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Plane Crash : 'जगातल्या कोणत्याच अपघातात ब्लॅक बॉक्स जळालेला नाही...'; अजित पवारांच्या अपघातावर जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच बोलले

Jitendra Awhad On Ajit Pawar Plane Crash : दिवंगत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात असल्याची वक्तव्य नेत्यांकडून केली जात आहेत. अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या अपघातावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Jagdish Patil

Ajit Pawar Death Plane Crash : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर विरोधी पक्षासह सत्ताधारी आमदारांकडूनही या अपघाताबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

अजितदादांच्या विमानाचा अपघात नव्हे तर घातपात असल्याची वक्तव्य नेत्यांकडून केली जात आहेत. या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेत अनेक मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या प्रश्नांमुळे लोकांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे.

तर या घातपातामध्ये मोठ्या नेंत्यांचा हात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. अशातच आता या सर्व अपघाताच्या घडामोडींवर ऐन अधिवेशनाच्या सुरूवातीलाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. आव्हाड यांनी देखील रोहित पवारांच्या मागण्यांमध्ये तथ्य असल्याचं वक्तव्य केलं आहे.

शिवाय कोणत्याही परिस्थित ब्लॅक बॉक्स जळलाच कसा? हीच माझी मोठी शंका असल्याचंही आव्हाड म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना आव्हाड म्हणाले, विमानाच्या ज्या भागात ब्लॅक बॉक्स ठेवला जातो. तो भाग जशाचा तसा आहे. मग ब्लॅक बॉक्स जळाला कसा? ब्लॅक बॉक्स ११ हजार सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाशिवाय जळत नाही. तरी सरळ सांगितलं जातं की तो जळाला, मात्र तो कसा जळाला? असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी रोहित पवार मागणी करतायत त्यामध्ये तथ्य असल्याचं म्हटलं. तर संबंधित विमान किती तास उडालं, त्याला ती परवानगी होती का नाही. डीजीसीए नेमकं काय कव्हर करायला बघतंय आणि कोणाच्या दबावाखाली काम करतंय का? हे सर्व प्रश्न समोर येत आहेत.

या प्रकरणाची चौकशीला जेवढा उशीर करतील तेवढा संशयाला वाव मिळणार आहे. ब्लॅक बॉक्स जळाला ही सर्वात मोठी माझी शंका आहे. तर जगातल्या कोणत्याही अपघातात ब्लॅक बॉक्स जळून गेला हे कधीही सांगितलं गेलं नाही, असा मोठा दावा देखील आव्हाड यांनी यावेळी केला आहे. शिवाय शंकेला चौकशीच्या माध्यमातूनच वाव मिळत असेल तर शंका उपस्थित होणारच, असंही आव्हाड यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT