Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News: आदिवासी महिलेच्या मारहाणीचा मुद्दा अजित पवारांनी मांडला विधानसभेत

सरकारनामा ब्युरो

Palghar News: पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचे विधीमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. (Ajit Pawar raised the issue of beating of tribal women in the assembly)

अजित पवार म्हणाले की, आपण जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे (६ मार्च) पालघरमधील डहाणू येथील कोहराळी पाड्यात पाण्यासाठी आदिवासी महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजधानी शेजारी असणाऱ्या अदिवासी भागातील बांधवांना अशा दुर्दैवी प्रसंगांना वारंवार तोंड द्यावे लागणे, त्यांना पाण्यासाठी वनवन करावी लागणे हे दुर्दैव आहे.

तसेच, राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची परवड होतेय, तसेच राजकीय दबावापोटी ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. गुन्हा दाखल करायला सुध्दा उशीर झाला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीकरुन पिडीत आदिवासी महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT