Aditya Thackeray, Raj Thackeray sarkarnama
मुंबई

दोन्ही ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरचा अजित पवारांनी एका वाक्यात विषय संपवला...

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले. आदित्य ठाकरे हे मे महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात अयोध्येला जाणार असल्याचे राऊतांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपला बहुप्रतिक्षीत अयोध्या दौरा जाहीर केला आहे. कोरोना काळात दोन वेळा रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्यावर राज ठाकरे ५ जून रोजी जाणार आहेत. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे.

दरम्यान दोन्ही ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्यावरुन आता राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. मात्र याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ज्याला अयोध्येला जायचा असेल तो जाऊ शकतो, त्यासाठी एवढा बोबटा करायची गरज नाही, निवडणुकाच्या काळात आम्ही आमची भूमिका मांडू. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाणार असल्याच्या प्रश्नावरही त्यांनी त्या विधानाला एवढं महत्व देण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

आज गिरगांव चौपाटी लगत सुविधापूर्ण व विलोभनीय ‘दर्शक गॅलरी’चे लोकार्पण कऱण्यात आले यावेळी ते बोलत होते. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, एक चंगल्या पद्धतीने हा प्रकल्प करण्या करीत आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. खूप चांगल्या प्रकारच्या स्पॉट आहे. मध्यंतरी काम सुरु असताना अनेकांनी याची खिल्ली उडवली होती. पण भरती असेल तेव्हा आपण पाण्यात आहोत असा अनुभव घेता येतो. आणखी इतर ठिकाणी अश्याच पद्धतीने विविंग गॅलरी उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT