Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Ajit Pawar, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

आंबेडकर-ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : मागील अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash-Ambedkar) हे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे राज्यात नवीन समिकरणे उदयाला येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

या पार्श्वभूमिवर पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना एकत्र येण्याची भूमिका मांडली. मतांची विभागणी टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यावे. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चेला तयार आहोत, असे पवार यांनी सांगितले. तसेच प्रकाश आंबेडकर आणि आरपीआय सोबत निवडणुका लढवल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आमच्या त्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली होती. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा केली होती. त्याबद्दल त्यांनी तशी माहितीही दिली होती, असे पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्या भूमिकेमुळे शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, शिवसेनेत (ShivSena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १३ खासदारांसोबतच्या बंडानंतर राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच मुंबई महापालिकेसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप-शिंदेगट एकत्र लढणार आहेत. तर मनसे स्वबळावर लढणार असल्याने मराठी मतांमध्ये फुट पडून शिवसेनेला फटका बसू शकतो. त्यामुळे ठाकरेंना नवीन मित्रांची गरज आहे. त्यासाठीच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग होऊ शकतो.

आता अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेला तयार आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाआघाडी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही आघाडी झाल्यास राज्यात भाजपला (BJP) मोठा फटका बसू शकतो. या विषयी अजून काँग्रेसची भूमिका समोर आलेली नाही. तरी महाविकास आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश झालाच तर महापालिका, लोकसभा आणि विधानसभेचे गणित बदलू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT