Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : 'मुख्यमंत्री करणार हे मला सांगायचं, मी पार्टीच आणली असती', अजित पवारांची टोलेबाजी

Ajit Pawar Eknath Shinde Devendr Fadnavis : अजित पवार म्हणाले, 'देवेंद्रजी यांची टर्म 99 ला सुरू झाली. एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली. या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सर्वात सिनिअर मीच. मी ९०च्या बॅचचा आहे.

Roshan More

Ajit Pawar : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज डॉ. प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे प्रकाशन ठाण्यातील सभागृहात करण्यात आले. या प्रकाशन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली.

अजित पवार म्हणाले, 'देवेंद्रजी यांची टर्म 99 ला सुरू झाली. एकनाथरावांची 2004 ला सुरू झाली. या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सर्वात सिनिअर मीच. मी ९०च्या बॅचचा आहे. सगळे माझ्या पुढे निघून गेले. मी मागेच राहिलो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊद्या द्या. ज्या त्या गोष्टी ज्या त्यावेळी घडत असतात. मी गमतीने काहींना म्हणाले. तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितलं तुम्ही इतके आमदार घेऊन आला तर मुख्यमंत्री करणार. मला सांगायचं मी पार्टीच आणली असती. शेवटी नशिबात असतं तेच होत, असे देखील अजित पवार म्हणाले.

'मी सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करत असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे माझ्यासमोर होते. पण आमच्यात कटूता नव्हती. आम्ही कधीच खालच्या पातळीला जाऊन टीका केली नाही. आमच्यात दुरावा नव्हता.सुसंस्कृत राजकारण करायचे us यशवंत चव्हाण यांनी आपल्याला सांगितले आहे. पण आजचे कार्यकर्ते बघतो. कोण ढेकूण म्हणतो. हे काही योग्य नाही', असे अजित पवार म्हणाले.

माणसांच्या गरड्यातील मुख्यमंत्री

महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे असे मुख्यमंत्री पाहिले. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मात्र, लोकांच्या गराड्यात राहुन काम करणारा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहतोय, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

माझा कोणी फोटो काढत नाही

अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी जातात. तेथे शेती करतात. त्याचे फोटो, व्हिडिओ येत असतात. मला देखील शेतीची आवड आहे. मी जेव्हा गावी जातो तेव्हा सहा वाजता शेतात फेरफटका मारतो. मात्र आमचा कोणी फोटो, व्हिडिओ काढत नाही. कारण सगळं फैन फॉलोइंग इकडे आहे, असे म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेंना चिमटा काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT