Ajit Pawar NCP Sharad Pawar Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : रामराजे तुतारी हाती घेणार? अजितदादा म्हणाले, 'त्यांचा निर्णय...'

Ajit Pawar NCP Sharad Pawar Ramraje Naik Nimbalkar : अजित पवार म्हणाले, आयाराम गयाराम वरून जे बोलत होते तेच आता आयाराम गयारामांना पक्षात प्रवेश देत आहेत.

Roshan More

Ajit Pawar News : इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताना रामराजे नाईक निंबाळकर यांचा देखील 14 ऑक्टोबरला पक्षात प्रवेश होणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी रामराजे यांचे नाव न घेता दिले होते. रामराजे यांनी यांनी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा आग्रह तुतारी हाती घेण्यासाठी असल्याचे देखील सांगितले होते.

रामराजे हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

'रामराजे यांच्यासोबत आमचं बोलणं झालं आहे. अजून त्यांनी भूमिका घेतली नाही.' असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे 14 ऑक्टोबरला रामराजे हे कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत. त्या मेळाव्यात ते काय निर्णय घेणार याकडे त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, 'रामराजे नाईक निंबाळकरांशी मी बोललोय. प्रफुलभाई बोललेत. सुनील तटकरे बोललेत. बातम्या वेगवेगळ्यात येत असतात. अनेकांच्या बद्दल येत असतात. त्यांनाही माहीत नसतं या बातम्या कशा आल्या. परंतु अजून त्यांनी तसा काही निर्णय घेतला नाही.'

मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडंल?

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बाहेर पडले. त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत वाद झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीतून दुसरा एक आमदाराचा कार्यक्रम असल्याने आपण बाहेर पडलो. मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होणार हे मला आधीच माहिती होतं. कारण त्या निर्णयावर अर्थमंत्र्यांची देखील स्वाक्षरी असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT