Ajit Pawar sarkarnama
मुंबई

अजित पवारच म्हणाले, राष्ट्रवादीचेही आमदार नाराज

सध्या महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सध्या महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) नाराजी नाट्य सुरु आहे. निधी वाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या (congress) आमदारांनी तर थेट पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रश्ना विचारला असता ते म्हणाले, निधी वाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (Ncp) आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यांचेही नाव नाराज आमदारांमध्ये टाका, अशी मिश्किल टिप्णणी केली.

अजित पवार मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादीचे आमदारही माझ्या जवळ नाराजी व्यक्त करतात. कोरोनामुळे निधी वाटपास मर्यादा होत्या. मात्र, आता आमदारांचा निधी पाच कोटी केला आहे. इतरही कामांसाठी निधी मंजूर केला जात आहे. त्या निधीतून राज्य विकासाला आपल्याला खिळ बसवू दयायची नव्हती. मात्र आम्ही जे-जे करता येईल ते-ते केले. कुठच्याही विकास निधींमध्ये आम्ही घट केली नाही. यावर्षी आपण रस्ते व विकास महामंडळाला विक्रमी असा २१ हजार कोटींचा निधी दिला.

आपण राज्यामध्ये कुठचाही नवीन कर लावलेला नाही. उलट गॅस सिलिंडरसंदर्भात १ हजार कोटींचा टॅक्स आम्ही माफ केला. काहीजण सांगत आहेत की, राज्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करावेत असे असेल तर केंद्रानेही आपले कर कमी करावेत, असेही पवार म्हणाले. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. विविध पक्षाचे खासदार भूमिका मांडतील आमच्या परीने गॅसच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कमी किंमती केल्या तरी पुन्हा पेट्रोल-डिझेल व गॅसच्या किंमती वाढतच आहेत. सध्या त्याचा आकडा कुठच्या कुठे जात आहे. यावर विविध पक्षाचे लोक आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादीनेही आंदोलन केले आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

कोरोनाकाळातील निर्बंध राज्य सरकारने हटवले त्यावरही पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी गुढीपाडव्यापासून संपूर्ण राज्यातील कोरोनाचे निर्बंध हटवले. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही जनता दरबार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असे कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यानुसार आज गुरूवारी स्वत: सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. तसेच मावळ व खारघर विभागातील कार्यकर्त्यांनी व काही मान्यवर कलावंतांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, असेही पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT