Ajit Pawar On Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Jitendra Awhad : डोळ्यात पाणी येऊन भावुक झालेल्या आव्हाडांना अजितदादा म्हणाले, 'आव्हाड आणि वेदना...'

Chetan Zadpe

Ajit Pawar On Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे दोन्ही गट म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट यांच्यामध्ये निवडणूक आयोगासमोर पक्ष कुणाचा यावर निवाडा सुरू आहे. पक्ष आणि घड्याळ चिन्ह आपलंच आहे, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे. अजित पवारांनी आयोगात केलेल्या युक्तिवादात पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर केलेल्या आरोपांवर शरद पवार गट दुखावला गेला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला असह्य वेदना होत असल्याबाबत भावुक वक्तव्य केले होते. यावर आत खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

शरद पवार हे आपल्या मनमर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्षात लोकशाही नाही, असे त्यांचे दावे ऐकून डोळ्यात पाणी तरळलं. ज्यांनी पक्षांचं रोपटं लावून ते झाड उंच केलं, त्यांनाच आज भोगावं लागत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी भावुकतेने आपल्या भावना बोलवून दाखवल्या होत्या. यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. वेदना आणि आव्हाड याचं कधी जुळतं का? मी तर यावर काही न बोललेलंच बरं, असं म्हणत त्यांनी आव्हाडांना चिमटा काढला.

निवडणूक आयोगात राष्ट्रवादीची पुढील सुनावणी ९ तारखेला होत आहे. या वेळीही दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद केला जाणार आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक हे अजित पवार गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगात शरद पवार गटाची बाजू कशी मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. उद्याच्या सुनावणीत केल्या जाणाऱ्या युक्तिवादानंतर दोन्ही गटांत जोरदार टीकाटिप्पणी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT