Dasara Melava 2022
Dasara Melava 2022  sarkarnama
मुंबई

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्याबाबत अजित पवारांचे सूचक व्यक्तव्य

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे गट यंदा शिवाजी पार्कात दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava 2022) आग्रही आहे. यासाठी एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाने अर्ज केला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आमदार सदा सरवणकर (Mla Sada Sarvankar) यांनी अर्ज केला आहे. शिवाजी पार्कात गेल्या काही दशकांपासून शिवसेना दसरा मेळावा घेत आहे. त्यामुळे आता या अर्जाबाबत काय निर्णय घेतला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय.

या मेळाव्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सूचक व्यक्तव्य केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, "दसरा मेळ्याच्या सभेनंतर कळेल कुणामागे किती जनता आहे," या विधानाने पवारांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

"‘सगळ्यांनाच परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील सर्व जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. पण त्यानंतर गेल्या २० जूनपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्यांनी पाहिल्या आहेत.” असे अजित पवार म्हणाले.

राज्यात गणेश उत्सव अजूनही सुरू आहे. त्याचप्रमाणे राजकीय भेटीगाठीही सुरू आहेत. अमित शाह हे मुंबईत आल्यानंतर राज ठाकरेंची भेट घेणार असल्याच्याही चर्चा आहेत. अशात राज ठाकरेंना हे आवाहन करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मीच पुढे नेतो आहे असं राज ठाकरेंनी नुकतंच एका भाषणात सांगितलं. आता महाराष्ट्र सैनिकाची ही साद राज ठाकरे ऐकणार का आणि दसरा मेळावा शिवसेनेकडून हायजॅक करणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलं आहे.

त्यामुळे शिवाजी पार्कवर राज ठाकरेही उपस्थित राहणार का? की शिंदे आणि राज ठाकरे एकत्रित दसरा मेळावा घेणार ? यावरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. जे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जातायत, त्यांना दसरा मेळाव्याचे आमच्याकडून आमंत्रण दिले जाईल. राज ठाकरे देखील हिंदुत्वाची भूमिका पुढे घेऊन जातायत तर त्यांनादेखील आमंत्रण दिले जाईल असं सदा सरवणकर यांनी म्हटलयं.

शिवाजी पार्कवर दरवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची ही परंपरा. पण यंदा हा मेळावा नेमका कोण घेणार, यावरून वाद सुरू झालाय. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार की, शिंदे गटाचा, याबाबत संभ्रम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT