Mumbai News : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार व खातेवाटप होऊन महिना उलटून गेल्यानंतरही महायुती सरकारकडून पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे विरोधी पक्षाकडून या दिरंगाईबद्दल सरकारला धारेवर धरले जात होते. महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये पालकमंत्रिपदावरून जोरदार रस्सीखेच असल्याने हे वाटप रखडल्याचे माहिती समोर येत होती. पण आता महायुतीन सरकारची पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे.यात बीड आणि पुण्याचे पालकमंत्रिपद (Guardian Minister) अजित पवारांकडे देण्यात आली आहे.
महायुती (Mahayuti) सरकारच्या रखडलेल्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. सरकारमध्ये विशेषतः राज्यातील रायगड, बीड, सातारा,जळगाव यासारख्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून महायुती सरकारमधील तीन घटक पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. पण अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.18) रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे.
सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्रि असणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रिपद हे संजय शिरसाट यांच्याकडे, पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्रिपद असणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला आहे. दुसरीकडे आठ दिवसावर प्रजासत्ताकदिन आला असला तरी जिल्हा मुख्यालयात आता कोणाच्या हस्ते ध्वजवंदन होणार हा प्रश्न सतावत होता.
गडचिरोली - देवेंद्र फडणवीस
ठाणे- एकनाथ शिंदे
मुंबई शहर- एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर - राधाकृष्ण विखे-पाटील
वाशिम- हसन मुश्रीफ
सांगली - चंद्रकांत पाटील
नाशिक - गिरीश महाजन
पालघर - गणेश नाईक
जळगाव - गुलाबराव पाटील
यवतमाळ - संजय राठोड
मुंबई उपनगर - आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री)
रत्नागिरी- उदय सामंत
धुळे - जयकुमार रावल
जालना - पंकजा मुंडे
नांदेड - अतुल सावे
चंद्रपूर - अशोक उईके
सातारा - शंभूराज देसाई
रायगड - आदिती तटकरे
कोल्हापूर - प्रकाश आबिटकर, माधुरी मिसाळ (सह पालकमंत्री)
गडचिरोली - आशिष जयस्वाल (सह पालकमंत्री)
वर्धा - पंकज भोयर
परभणी- मेघना साकोरे-बोर्डीकर
छत्रपती संभाजीनगर - संजय शिरसाट
धाराशिव - प्रताप सरनाईक
बुलढाणा - मकरंद जाधव
सिंधुदुर्ग - नितेश राणे
अकोला - आकाश फुंडकर
गोंदिया - बाबासाहेब पाटील
लातूर - शिवेंद्रसिंह भोसले
नंदूरबार - माणिकराव कोकाटे
सोलापूर - जयकुमार गोरे
हिंगोली - नरहरी झिरवाळ
भंडारा - संजय सावकारे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.