Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Oath Ceremony: अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ...

Ajit Pawar Deputy Chief Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. आज शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे अजित पवार यांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान, आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पवार राजभवनावर दाखल झाले आहे. त्यामुळे अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

मात्र, यामुळे पुन्हा एकाद पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथविधी गाजणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर ८० तासात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे.

अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे अनेक नेते शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफही मंत्री होणार असल्याची चर्चा आहे. राजभवणावर खासदार अमोल कोल्हे आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरेही उपस्थित आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT