Ajit Pawar, Devendra Fadnavis News Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Meet Ajit Pawar : महायुतीत अजितदादा नाराज, मध्यरात्री दिल्लीवारी, आता देवेंद्र फडणवीस अचानक भेटीला..!

Devendra Fadnavis Meet Ajit Pawar : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 24 July : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आरएसएस आणि भाजपशी संबंधित अनेक संस्थांनी अजितदादांबाबत केलेली वक्तव्य आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांना सोबत घेतल्यामुळे व्यक्त केलेली उघड नाराजी, या सगळ्यामुळे दादा नाराज असल्याचं बोललं जात आहे.

या चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी मंगळवारी (23 जुलै) रात्री उशिरा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्लीत मध्यरात्री 1 वाजता भेट घेत चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीतील महायुतीचं जागावाटपाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

अजितदादा आणि अमित शहा (Amit Shaha) यांच्या बैठकीच्या चर्चा सुरु आहेत. अशातच आज भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर जाऊन तडकाफडकी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. तर अचानक झालेल्या या बैठकीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

तसंच या भेटीत विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला का? अजितदादा (Ajit Pawar) खरंच नाराज आहेत का? असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना नेमकी काय ऑफर दिली आहे का? असे अनेक प्रश्न या भेटीनंतर उपस्थित केले जात आहेत.

मात्र, या भेटीमधील तपशील अद्याप समोर आला नाही. परंतु, महायुतीत अजितदादा नाराज असल्याच्या चर्चांनंतर मध्यरात्री दिल्लीवारी आणि आता अचानक थेट देवेंद्र फडणवीस भेटीला आल्यामुळे काहीतरी मोठं या नेत्यांमध्ये शिजत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT