Mahavikas Aghadi Ajit pawar Uddhav thackeray Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : वंचित आघाडीसाठी तयार असल्यास मविआची भूमिका काय? अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar : राष्ट्रवादीची सहमती नाही, असे बोलले जात होते...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात अधिकृत युतीची घोषणा झाली आहे. या नव्या समीकरणाबाबत चर्चा होत असतानाच वंचित हा महाविकास आघाडीचा भाग होऊ शकतो का? यावरही तर्क वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस यासाठी सहमत होणार का?, असाही प्रश्न उपस्थित होत होता. यावर आता विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारणा झाली असून यावर सर्वच सहकारी पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, समान विचार असलेल्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्रित लढले पाहिजे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असेल तर, आम्हाला याचा आनंदच आहे, असेही पवारांनी सांगितले. अजित पवार म्हणाले. यामुळे आता या गोष्टीवर सर्व सहमती घडून आले असल्याचे दिसून येत.

दरम्यान, वंचितला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीची सहमती नसल्याचे बोलले जात होते. मात्र, यावर आता खुद्द अजित पवारांनी पूर्णविराम देत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे महाविकास आघाडीत आता प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीचा समावेशाची फक्त औपचारिकताच बाकी असल्याचं बोललं जात आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा आता कधी होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT