Nawab Malik  Sarkarnama
मुंबई

Nawab Malik: नवाब मलिकांचा प्रचार करण्यास भाजपचा नकार; आता काय होणार?

Mankhurd Shivajinagar Assembly Constituency: सुरवातीपासून मलिक यांना विरोध करणाऱ्या भाजपने निवडणुकीतही आपली भूमिका कायम ठेवल्याने मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या विरोधाला न जुमानता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP AP News: कुख्यात गुंड दाऊद आणि दाऊदशी संबंधीत असलेल्या व्यक्तींशी संबध असल्याच्या आरोपावरुन जेलची हवा खाऊन आलेले नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत पुन्हा संधी दिली आहे. मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांचा प्रचार करण्यास भाजपने नकार दिला आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. सना मलिक भाजपच्या उमेदवार आहेत. आमची भूमिका दाऊद आणि दाऊदशी संबंधीत व्यक्तीच्या संबंधीची नाही.'भाजप नवाब मलिकांचा प्रचार करणार नाही' अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे. मलिक सध्या जामीनावर आहे.

भाजपने प्रचार करण्यास नकार दिल्याने मलिक यांच्यासोबत आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. भाजपच्या भुमिकेचा फटका त्यांना प्रचारात बसेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नवाब मलिक यांची कन्या सना मलिक या महायुतीकडून अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फूटीनंतर नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मलिकांना राष्ट्रृवादीत प्रवेश दिल्याने भाजपने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट अजित पवार यांना पत्र लिहिती मलिक याच्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट करीत नाराजी व्यक्त केली होती.

नवाब मलिक यांना पक्षात सहभागी करुन घेतल्यास महायुतीत आपली मैत्री तुटूव शकते, असे स्पष्ट संकेतदेखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.सुरवातीपासून मलिक यांना विरोध करणाऱ्या भाजपने निवडणुकीतही आपली भूमिका कायम ठेवल्याने मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजपच्या विरोधाला न जुमानता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT