CM Chandrasekhar Rao-CM uddhav thackery
CM Chandrasekhar Rao-CM uddhav thackery  Sarkarnama
मुंबई

दादाची जागा ज्युनियर ठाकरेंनी घेतली: केसीआर भेटीत तेजस ठाकरेंना पाहून चर्चांना उधाण

सरकारनामा ब्युरो

मुंबई: देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना गोवा आणि उत्तरप्रदेशातही आपली ताकद आजमावून पाहत आहे. अशातच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (CM Chandrasekhar Rao) आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांची भेट घेतली.

विशेष म्हणजे, यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते, पण उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे (Tejas Thackeray)यावेळी वडिलांसोबत उपस्थिती लक्षवेधी ठरली. या निमित्ताने आता तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात एंट्री करणार का, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सकाळी मुंबईत दाखल झाले. उद्धव ठाकरेंचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरच भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राज्यासह देशभरातील विविध मुद्द्यावर चर्चा झाली. विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरेंसोबत यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेही यावेळी उपस्थितीत असलेले पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांनी स्वत: आपल्या तेजस ठाकरेंची चंद्रशेखर राव यांना ओळख करून दिली.

तेजस ठाकरे यांनीही मुख्यमंत्री राव यांच्याशी संवाद साधला. चर्चेवेळी टेबलवर फक्त तिघे म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि तेजस ठाकरे होते. राजकीय गप्पासोबतच तेजस यांनी त्यांच्या आतापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या संशोधन आणि कार्याबद्दल राव यांना माहिती दिली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे नेहमी मुख्यमंत्र्यांसोबत दिसतात. पण, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे सातारा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या जागा आज तेजस ठाकरे यांनी भरून काढली, त्यांच्या या उपस्थितीने उपस्थितांचेही लक्ष वेधून घेतले होते. तर या निमित्ताने आता तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात एंट्री करतात की काय, अशा चर्चांनाही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT