Parambir Singh 
मुंबई

मोठी बातमी : परमबीरसिंग यांचं गुजरात कनेक्शन...अल्पेश पटेल गजाआड

परमबीरसिंग यांच्याभोवतीचा फास आता आवळत चालला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Parambir Singh) यांच्याभोवतीचा फास आता आवळत चालला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील (Extortion Case) एका आरोपीला पोलिसांनी बुधवारी रात्री गुजरातमधून (Gujrat) अटक केली. परमबीरसिंग यांनी त्याच्यामार्फत खंडणी उकळल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांच्या हाती परमबीरसिंग यांच्याविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचे मानले जात आहे.

परमीबरसिंग याच्याविरोधात मागील महिन्यात दाखल झालेला हा चौथा गुन्हा होता. व्यावसायिक विमल अग्रवाल यांची ही तक्रार दिली आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान परमबीरसिंग यांनी आपल्याकडून नऊ लाख रुपये वसुल केले, आणि दोन मोबाईल फोन त्यांनी घेतल्याचा आरोप विमल अग्रवाल यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू करण्यात आला आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी गुरूवारी अल्पेश पटेल (Alpesh Patel) नावाच्या हवाला ऑपरेटरला अटक केली आहे. गुजरातमधील मेहसाणा रेल्वे स्थानकात पटेलला अटक करण्यात पोलिसांना बुधवारी रात्री यश आलं. सिंग यांनी पटेल याच्यामार्फत खंडणी वसूल केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खंडणी प्रकरणात पोलिसांनी केलेली ही पहिलीच अटक असल्याचे समजते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून परमबीरसिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला आहे. परमबिरसिंग याच्या लेटरनंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ईडीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोठ्या सुट्टीवर गेलेले परमबीरसिंह मात्र अद्याप हजर न झाल्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. परमबीर हे त्याची नियुक्ती केलेल्या गृहरक्षक दलाचे संचालक म्हणून काही दिवस हजर झाले आणि ५ मे रोजी सुट्टीवरही गेले. ते आजपर्यंत हजर झालेले नाहीत. ते देशाबाहेर गेल्याचे समजते. त्यांच्या चंदीगड येथील घराला कुलूप आहे. त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्याशी संपर्क होत नसल्याने लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT