Ambadas Danve Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve Abuse : 'मी चार वेळा तडीपार, बोट दाखवले तर...'; शिवीगाळीनंतर अंबादास दानवेंची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Legislative Council : मी सच्चा शिवसैनिक आहे कोणी माझ्याकडे बोट केलं तर बोट तोडण्याची ताकद माझ्याकडे आहे. प्रसाद लाड आता मला हिंदुत्व शिकवणार का?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषद जोरदार राडा झाला. विधान परिषदेत कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी भाजपचे नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. यानंतर उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. यानंतर दानवे यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर दानवे आपली बाजू मांडताना सभागृहात नेमके काय झाले याचा घटनाक्रम सांगितला.

देशाच्या संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी हिंदुत्वाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेत उमटले. यावरून सत्ताधारी पक्षाचे प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि अंबादास दानवे यांच्या यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली. यात अंबादास दानवे यांनी लाड यांनी माझ्याकडे बोट का दाखवले, असे म्हणत थेट शिवीगाळ केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

यावरून सत्ताधारी पक्षातील लोकांनी सभागृहातून बाहेर येत जोरदार घोषणाबाजी करत दानवे Ambadas Danve यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र या सर्व प्रकरणावर दानवे यांनी सभागृह बाहेर येताच आक्रमक मला झालेल्या गोष्टीचा अजिबात पश्चाताप नसल्याचे सांगितले. माझ्याकडे कोणी बोट केल तर त्याला मी सोडणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे कोणी माझ्यावर बोट केले तर ते बोट तोडण्याची ताकद माझ्याकडे आहे, असा इशारच त्यांनी सत्ताधारी आमदारांना दिला.

सभागृहात नेमके काय घडले?

दानवे म्हणाले, तो परिषदेतील विषय नसल्याने येथे उपस्थित करण्याची गरज नव्हती. शिवाय मी सभापतींना हा विषय सभागृहातील नसून त्यावर बोलायला नको असे सांगितले होते. मात्र त्याचवेळी समोरचे सदस्य माझ्याकडे बोट दाखवून बोलू लागले. त्यांनी माझ्याकडे बोट दाखवल्यानंतर मी देखील त्यांना प्रत्युत्तर दिले.

माझ्याकडे समोरच्या सदस्यांनी बोट दाखवण्याचीही गरज नव्हती. मी विरोधी पक्षनेता असून त्याआधी मी सच्चा शिवसैनिक आहे. भाजप आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? आम्ही पहिल्यापासून हिंदुत्ववादी आहोत. माझ्यावरती अनेक केसेस आहेत. मी चार वेळा मी तडीपार झालेलो माणूस आहे आणि आता प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित सत्ताधारी ललकारले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT