Ambadas Danve On reservation meeting Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve On Reservation Meeting : आरक्षणाच्या बैठकीवर अंबादास दानवेंची टीका, म्हणाले विरोधी पक्षाच्या नावाखाली...

Ambadas Danve On reservation Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली.

Jagdish Patil

Mumbai Monsoon Session : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर विरोधकांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गपचूप बैठका न घेता उघडपणे चर्चा करावी. सर्व पक्षाच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपले अजेंडा राबवला जात आहे. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कालच्या बैठकीवर केली आहे.

आरक्षणाच्या बैठकी संदर्भात बोलताना दानवे म्हणाले, "आरक्षणाबाबत सत्ताधारी मंत्र्यांमध्ये वेगवेगळी भूमिका आहे. सरकारची भूमिका एक असली पाहिजे. मात्र हे मंत्रिमंडळ तीन तोंडाच आहे. तिघांची तोंड तीन बाजूला असतात. गुपचूप व्यक्तिगत चर्चा केली जाते आणि

सर्व पक्षाच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या खांद्यावर बंदुक ठेवून आपले अजेंडे राबवले जातात. अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला. तसेच याबाबत अधिवेशनात विरोधी पक्षासोबत चर्चा करायला पाहिजे होती. जेव्हा स्वतः काही निर्णय घेतात तेव्हा स्वतःच्या अंगावर गुलाल टाकून घेतात. असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री मराठा तर उपमुख्यमंत्री ओबीसी समजाशी बोलताय

मुख्यमंत्री मराठा समाजाची तर उपमुख्यमंत्री ओबीसी (OBC) समाजाशी बोलताय. असं गुपचूप बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्या कानावरती देखील हा विषय घालायला पाहिजे होता, असं दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT