Ambadas Danve Vs Prasad Lad  Sarkarnama
मुंबई

Ambadas Danve Vs Prasad Lad : मोठी बातमी! विधानपरिषदेत राडा; दानवेंकडून लाड यांना शिवीगाळ, कामकाज स्थगित

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस चांगलाच वादळी ठरला.विरोधकांकडून सत्ताधारी महायुतीला घेरण्यात आले.विधानसभेसह विधानपरिषदेच्या सभागृहात विविध मुद्द्यांवर खडाजंगी झाली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत संसदेच्या सभागृहात केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद विधानपरिषदेत उमटलेले दिसून आले.

त्यातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपच्या प्रसाद लाडांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरुन जुंपल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. यानंतर विधान परिषदेचं कामकाज स्थगित करण्यात आल्याची घोषणा उपसभापति नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

विधान परिषदेच्या सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्त्यव्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, यावर दानवेंनी राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याची विधानपरिषदेत चर्चा नको अशी भूमिका घेतली. यानंतर दानवे आणि लाड यांच्यातला वाद टोकाला गेला.

दानवे बोलत असतानाच प्रसाद लाड यांनी त्यांच्याकडे हात करत तीव्र विरोध दर्शवला. त्यावेळी दानवे यांनी माझ्याकडे हात करायचा नाही, असं म्हणत प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आजचं कामकाज स्थगित केले.

विधान परिषदेच्या सभागृहात झालेल्या प्रकारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मीडियाशी संवाद संवाद साधला.यावेळी ते म्हणाले, माझा तोल गेलेला नाही. माझ्याकडे कुणी बोट दाखवून बोलले तर मी बोट तोडणारा माणूस आहे. मी कुणाला घाबरणारा माणूस नाही. माझ्याकडे समोरच्या सदस्यांनी बोट दाखवण्याचीही गरज नव्हती. मी विरोधी पक्षनेता नंतर आहे. आधी मी सच्चा शिवसैनिक आहे.

भाजप आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? आम्ही पहिल्यापासून हिंदुत्ववादी आहोत. माझ्यावरती अनेक केसेस आहेत. मी चारवेळा मी तडीपार झालेला माणूस आहे आणि आता प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का ? असा सवाल उपस्थित करत दानवे आणि आपली भूमिका स्पष्ट केली.आपण बाळासाहेब ठाकरेंचा माणूस आहे. आणि मला प्रसाद लाडसारखा माणूस हिंदुत्व शिकवणार का? असा संतप्त सवालही दानवे यांनी उपस्थित केला.

दानवे म्हणाले, माझ्याकडे हातवारे करून माझ्याशी बोलण्याची गरज नव्हती. मला माझ्या वक्तव्याचा अजिबात पश्चाताप नाही असेही ते म्हणाले. माझा राजीनाम्याची मागणी करत आहे. मात्र माझा राजीनामा मागण्याची मागण्याचा अधिकार केवळ माझ्या पक्षप्रमुखांना आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT