Sanjay Raut Press
Sanjay Raut Press  Sarkarnama
मुंबई

कधीकाळी राज ठाकरेंसोबत बसणाऱ्या शिशिर शिंदेंवर आज शिवसेनेत दुर्देवी वेळ...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक आरोप केले. याच पत्रकार परिषदेत शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेने आपले सर्व नेते, उपनेते, आमदार, खासदार यांना एकत्र करुन ही पत्रकार परिषद घेतली. यावरुन भाजप-शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता यामध्ये मनसेने देखील उडी घेतली आहे. या पत्रकार परिषदेदरम्यानचा एक फोटो पोस्ट करत मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी मनसे (MNS) सोडून शिवसेनेत गेलेल्या शिशिर शिंदेंना (Shishir Shinde) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेय खोपकर म्हणाले, "मनसे सोडून गेल्यावर दुसऱ्या पक्षात नेत्यांची पण काय गत होते ते या छायाचित्रावरुन दिसते. राज ठाकरेंच्या पंगतीत बसणारे शिशिर शिंदे, आजच्या टुकार पत्रकार परिषदेत नगरसेवकाच्या मागे उभे होते, किती दुर्देव!" असे म्हणत त्यांनी शिशिर शिंदेंवर टीका केली आहे.

संजय राऊत यांनी काल मुंबईत शिवसेना भवनात आमदार-खासदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट करत भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा; अन्यथा तुम्हाला टाईट करण्यात येईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी दिल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. या वेळी राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नील सोमय्या, मोहित कंबोज यांच्यासह माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोप केले आहेत.

देवेंद्र फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे. तसेच PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्यापासून १२ हजार कोटी रुपयांची जमीन मोहित कंबोजने १०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे. त्याचबरोबर निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली आणि याच वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत, असाही आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT