Amit Shah Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut On Amit Shah: ''अमित शाह गृहमंत्री कमी आणि भाजपा नेते जास्त वाटतात,या देशाला...''; राऊतांचा घणाघात

Political News : शाह यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम दिसतंय...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. एकाच महिन्यात शाह दुसऱ्यांदा महाराष्ट्रात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. तसेच शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बुधवारी(दि.२६) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यासह राज्यातील चालू घडामोडींवरही भाष्य केलं.राऊत म्हणाले,अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांनी खरंतर काश्मीरात जास्त जायला हवं. जिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तिथे जायला हवं. परंतु त्यांना महाराष्ट्रावर जास्त प्रेम दिसतंय असा टोला राऊतांनी लगावला.

...या देशाला उत्तम गृहमंत्र्यांची गरज!

सरकार अस्थिर आहे. सोंगटे आणि गोटे हलवायचे असतील तर त्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतील. अमित शाह(Amit Shah) हे गृहमंत्री कमी आणि भाजपा नेते जास्त वाटतात. या देशाला उत्तम गृहमंत्र्यांची गरज आहे. महाराष्ट्रालाही निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. पाठीमागे सरदार पटेल फोटो लावून चालत नाही असा टोला राऊतांनी शाह यांना लगावला.

संजय राऊत म्हणाले की, लोकं आमच्याबरोबर आहे. आम्ही तुमच्याशी लढू याचीच तुम्हाला भीती आहे. कोकणची लोकं आमच्या पाठिशी आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत. बारसूतल्या स्थानिक भूमिपुत्रांना जर हा जहरी प्रकल्प नको असेल. जर ते मरायला तयार असतील तर शिवसेना त्यांना मरु देणार नाही. पहिली गोळी शिवसेनेच्या छातीवर जाईल असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

...तर एअर बस, फॉक्सकॉन वेदांत हे बाहेर का गेले?

बारसू प्रकल्पाबाबत शिवसेनेने अजिबात दुटप्पीपणाची भूमिका नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ही आमची भूमिका आहे. उद्योग राहिला पाहिजे. रोजगार वाढला पाहिजे. उद्योग जगला तर कामगार जगेल ही आमची भूमिका कायम आहे. मग एअर बस, फॉक्सकॉन वेदांत हे बाहेर का गेले? त्यावर उद्योगमंत्र्यांनी तोंड उघडावे अशा शब्दांत राऊतांनी सामंतांनी डिवचलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT