New Delhi News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली बालेकिल्ला समजला जातो. पण याचठिकाणी भाजपनं शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना फोडत त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला. त्यामुळे शिवसेनेनं प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कॅबिनेटच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. यानंतर एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. यानंतर पक्षप्रवेशावरुन महायुतीत सुरू असलेल्या नाराजीवरुनच ही भेट घेतल्याची चर्चा सुरू असतानाच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंनी बुधवारी(ता.19) सायंकाळी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बिहारमध्ये एनडीएनं मिळवलेल्या विजयाबद्दल शाहांचं अभिनंदन करण्यासाठी भेट घेतली. उद्या बिहार सरकारचा शपथविधी आहे, यासाठी मला निमंत्रण मिळालं आहे. या यशाचं अभिनंदन करण्यासाठी मी अमित शहांची भेट घेतली. यात चांगली चर्चा झाली. या निवडणुकीत शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचंड मेहनत घेतली. बिहारच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी बिहारला जाणार आहे.त्याचवेळी शाहांना भेटण्याचं ठरवलं,असंही शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंनी म्हणाले, मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो. मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सूरु आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्येकुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीतला नव्हताच, असेही एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातले भाजपचे मुख्य लिडर आहेत, तर मी शिवसेनेचा मुख्यनेता आहे. आम्ही दोघांनीही आमच्या नेत्यांना महायुतीला गालबोट लागणार नाही, अशा पध्दतीचं काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुख्यमंत्री आणि आम्ही काल बसून चर्चा करत मार्ग काढला आहे. तो स्थानिक पातळीवरील विषय होता, तो कालच संपला आहे. महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. विधानसभेला जसं मोठ यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल असंही शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महायुतीत कल्याण डोंबिवलीमधील नेत्यांच्या फोडाफोडीवरुन वादाची ठिणगी पडल्याचं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी पाहायला मिळालं होतं.शिवसेना मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवरच बहिष्कार टाकत आक्रमक बाणा दाखवून दिला होता. त्यानंतर, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी काही मंत्र्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीतही फडणवीसांनी शिवसेनेच्या नेत्यांना झापल्याचं बोललं जात आहे.
पण शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत भाजपचे वरिष्ठ नेते तथा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची तक्रार केल्याचं बोललं जात आहे. त्यामध्ये, प्रामुख्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याविषयी मोठी नाराजी व्यक्त केल्याचीही सूत्रांची माहिती आहे. ते मोठ्या रक्कमा घेऊन भाजपमध्ये नेत्यांचा प्रवेश घडवून आणत असल्याचाही आरोप केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.