मुंबई : गणपती विसर्जनानंतर (Ganesh Immersion)आज (शनिवारी) सकाळी मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वच्छता अभियान (Cleaning Beach) राबवण्यात आले. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray)यांच्या उपस्थित मनसैनिकांनी किनाऱ्यावर वाहून आलेले निर्माल्य आणि इतर कचरा गोळा केला.
"आपला समुद्रकिनारा आपली जबाबदारी" असे म्हणत वर्सोवा विधानसभेचे मनसे विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली सात बंगला - वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनसैनिकांनी स्वच्छता अभियान राबवत मोठ्या प्रमाणात समुद्रात किनाऱ्यावर वाहून आलेले निर्माल्य आणि इतर कचरा गोळा केला. यावेळी सफाई मोहिमेत मनसैनिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला.
अमित ठाकरेंसोबत नितिन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांनी देखील बीच क्लिन अप मोहिमेमध्ये हातभार लावला. यावेळेस आयईएस मॉर्डन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. मनसे कडून मुंबईत गिरगाव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा येथे, रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड तर रत्नागिरीत मांडवी येथे बीच क्लिन अप मोहिम जाहीर करण्यात आली होती.
देवेंद्र फडणवीस जुहू बीचवर..
गणपती विसर्जनानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष पुढे येताना दिसत आहेत. दिव्याज फाउंडेशनच्यावतीने गणेश विसर्जनानंतर जुहू बिच स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस , अभिनेते अनुपम खेर , अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्यासह विविध भाजप नेत्यानी उपस्थिती दर्शवत जुहू बीच स्वच्छतेची मोहिम हाती घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.