amit thackeray | raj thackeray sarkarnama
मुंबई

Amit Thackeray Breaking News : अमित ठाकरेंची उमेदवारी 'फायनल', मतदारसंघही ठरला ? उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा..?

MNS Assembly Election 2024 : अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षनिरीक्षकांनी अमित ठाकरे यांच्यासाठी 'भांडुप' मतदारसंघ सुरक्षित असल्याचा अहवाल पक्षाकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.पण आता...

Deepak Kulkarni

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. आपल्याला लोकांसाठी काही करायचं असेल, तर स्वत: संसदीय राजकारणात यायला हवं, असं सांगत ठाकरे यांनी विधानसभेसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं.

मात्र, अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवितात?याबाबत चर्चांना उधाण आले होते. अखेर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.अमित ठाकरे ( Amit Thackeray ) यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षनिरीक्षकांनी अमित ठाकरे यांच्यासाठी 'भांडुप' मतदारसंघ सुरक्षित असल्याचा अहवाल पक्षाकडे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.पण आता अमित यांना नव्या मतदारसंघातून उमेदवारी फायनल झाल्याची माहिती समोर येत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करत असून उमेदवारांची चाचपणी करत आहेत. यातच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा विधानसभेच्या मैदानात उतरू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यासाठी सेफ मतदारसंघाची चाचपणी देखील मनसेकडून सुरू होती.

अमित ठाकरे हे आता दादर माहिम या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.तसेच त्यांना शिवसेना ठाकरे गटही पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसेनं विधानसभेसाठी 'एकला चलो'रेचा नारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसेनं 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करत असून उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना निवडणूक लढण्याचे संकेत दिले होते. "आपल्याला लोकांसाठी काही करायचं असेल, तर स्वत: संसदीय राजकारणात यायला हवं," असं सांगत अमित ठाकरे यांनी विधानसभेसाठी तयार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवितात? निवडणूक लढणार की नाही? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

अगदी सुरुवातीला स्वबळावर लढून पाहिलं, दखल घेण्याजोगं यशही मिळालं पण मग युतीसोबत आणि त्यानंतर आघाडीसोबत जाऊन पाहिलं; पण पदरी अपयश आलं... आता मात्र 'मनसे'चं इंजिन पुन्हा एकदा विधानसभेच्या रूळावरून स्वबळावर धावायला यार्डात सज्ज आहे. 2009 मध्ये 13 आमदार निवडून आणलेल्या मनसेला आपल्या इंजिनाला 2014 आणि 2019 मध्ये प्रत्येकी एकच डबा जोडता आला होता. यंदा काय होणार?, असा प्रश्न पडतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT