Amol Mitkari
Amol Mitkari  
मुंबई

अमोल मिटकरींनी स्पष्टच सांगितलं, राजकीय भुंकप झाला तर...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य धोक्यात आले आहे. शिवसेनेकडून (Shivsena) त्यांची मनधरणी करण्यात येत असली तरी आता माघार नाही, या विचाराने एकनाथ शिंदे यांनी बंडाची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राज्यातील घडामोंडी पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसनेही आपापल्या पक्षांच्या आमदारांसोबत बैठका सुरु आहेत. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर त्यांना विचारल असता, "महाविकास आघाडी सरकार बरखास्त होण्यासंदर्भात चर्चा झाली नाही, पण राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल यावर चर्चा झाली. या संकटाच्या काळात राष्ट्रवादी शिवसेना आणि महाविकास आघाडीसोबत आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आम्हाला विश्वास असल्याने आम्ही त्यांच्या सोबत असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.

भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही. राज्यात सरकार बरखास्त होण्याची वेळ आलीच तर आम्ही विरोधी पक्षात बसु, हे आम्ही या आधीही सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंना समर्थन दिलेल्या आमदरांचं बहुमत सिद्ध होऊ शकत का यावर राजकीय भविष्य अवलंबून असेल. असही मिटकरींनी म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी एक शायरीही ट्विट केली आहे. ''गुजर जायेगा ये दौर भी थोडा सा इत्मीनान तो रख जब खुशियां ही नही ठहरी तो गम की क्या औकात है|'' अशी शायरी त्यांनी ट्विट केली आहे.

काही सकंटे वारंवार येत असतात. मात्र हे ही सकंट दुर होईल आणि भाजपाचे जे स्वप्न आहे, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या स्वप्नाला त्याला सुरुंग लागेल, ते स्वप्न अपूर्ण राहिल, असं त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची राजकीय भुकंप व्हावा अशी भाजपाची इच्छा आहे. पण जोपर्यंत शरद पवार या राजकीय मैदानात आहेत तोपर्यंत भाजपाचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, मात्र राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सरकारसोबत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT