मुंबई

Amol Mitkari: अजित पवारांशी वाद घालणाऱ्या 'त्या' महिला IPS अधिकाऱ्याचं 'जात प्रमाणपत्र' तपासून घ्या; अमोल मिटकरींचं थेट UPSC ला पत्र

Amol Mitkari: महिला IPS अधिकाऱ्यावर फोन कॉलद्वारे दादागिरी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरु झाली त्यानंतर ही एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

Amit Ujagare

Amol Mitkari: महिला IPS अधिकाऱ्यावर फोन कॉलद्वारे दादागिरी करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरु झाली आहे. त्यातच आता आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचं एक पत्र व्हायरल झालं आहे. यामध्ये अजित पवारांशी वाद घालणाऱ्या IPS अंजली कृष्णन यांचं जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्या, अशी सूचना मिटकरी यांनी थेट UPSCला पत्र लिहून केली आहे.

नेमका विषय काय?

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अमोल मिटकरी यांचं युपीएससीला सूचना करणारं हे पत्र ट्विट केलं आहे. हे पत्र शेअर करताना दमानिया म्हणतात की, हा काय फालतूपणा आहे? अमोल मिटकरींनी त्यांच्या Bossच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिलंय की स्वतःचं डोकं वापरलं? अंजना कृष्णाची चौकशी? का? तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून? चौकशी त्या अजित पवारांची झाली पाहिजे. ज्या कंपन्या अजित पवारांच्या कब्ज्यात आहेत, त्याच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. ज्या कंपन्यांमध्ये सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील त्यांच्या चौकश्या झाल्या पाहिजेत. त्या IPS ऑफिसरला जरा छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेन. IPS ऑफिसर्सच्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे.

Amol Mitkari

मिटकरींच्या पत्रात काय?

अमोल मिटकरी युपीएससीला लिहिलेल्या पत्रात म्हणतात, "मी महाराष्ट्र विधान परिषदेचा सदस्य या नात्यानं आपलं लक्ष या गोष्टीकडं वेधू इच्छितो की, अंजना कृष्णा (आयपीएस) यांच्याद्वारे सबमिट करण्यात आलेले त्यांचे शैक्षणिक, जात तसंच इतर महत्वाच्या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी/पडताळणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी सबमिट केलेल्या कागदपत्रांची सत्यता निश्चित केली जावी. तसंच संबंधित विभागांना योग्य ती माहिती उपलब्ध करुन द्यावी. मी माझी आपल्याला विनंती आहे. कृपया यावर आवश्यक कार्यवाही करावी." या पत्रावर आजचीच म्हणजे ५ सप्टेंबर २०२५ ही तारीख पेनानं लिहिण्यात आली आहे. म्हणजेच आजचं हे पत्र तयार करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT