Amol Mitkari - Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

Amol Mitkari News : राष्ट्रवादीच्या 'एन्ट्री'नं आधीच शिवसेनेत नाराजी, त्यात मिटकरींचा मोठा बाॅम्ब ; '' याचवर्षी अजितदादा मुख्यमंत्री...''

Maharashtra Politics : '' आगे आगे देखो होता है क्या...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अजित पवार यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यांनी रविवारी (दि.२) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजितदादांच्या शिंदे फडणवीस सरकारमधील एन्ट्रीनं शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा जोर धरु लागली असतानाच आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीदि खळबळजनक विधान केलं आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी मंगळवारी( दि. ४) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मिटकरी म्हणाले, अजितदादाच २०२३मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करतील. आता चर्चा नाही तर ते खरंच आहे. आणि त्यांच्याबाबतच्या अनेक चर्चा बऱ्यापैकी या खऱ्या ठरतात. आणि अजित पवारांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. त्यांचे आशीर्वाद असतील तर ते नक्कीच मुख्यमंत्री होतील.

महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांचा निकाल काय येईल तर त्यानंतर ठरवूयात. पण सध्या तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे(Eknath Shinde)च असणार आहेत. पण आम्हांलाही वाटतं की, दादांनी मुख्यमंत्री असावं. एक कार्यकर्ता म्हणून आमचीही भावना आहे. त्याचमुळे पांडुरंगाच्या चरणी मी साकडं घातलं आहे की, येत्या कार्तिकी एकादशीची महापूजा मुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी करावी.

शिवसेने(Shivsena) चे आमदार अपात्र होतील का नाही याबाबत बोलण्याइतपत मी कायद्याचा अभ्यासक नाही. ते सर्व अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना आहेत. पण कायदेशीर बाबींमधलं मला जास्त काही ज्ञान नाही. त्यामुळे काही सत्ता समीकरणाचा पेच उभा राहिला तर काही सांगता येत नाही. आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत मिटकरींनी सस्पेन्स कायम ठेवला.

शरद पवारां(Sharad Pawar)नी त्यांचे फोटो वापरण्यावरुन अजित पवारांच्या गटाला फटकारलेले असताना मिटकरींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवार हे आमच्या सर्वांचे बाप आहेत. पण बापानं जरी म्हटलं की खबरदार माझा फोटो लावायचा नाही घरात तरी मुलं तो लावतच असतात. त्यामुळे आम्ही लावला तरी साहेब आम्हांला रागावणार नाहीत किंवा फटकेही देणार नाहीत असंही मिटकरी म्हणाले. बापानं सांगितलेलं सगळंच ऐकायचं नसतं असंही मिटकरी यावेळी म्हणाले.

अजित पवारांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्वत: जागा विकत घेऊन राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय उभं केलं आहे. त्यामुळे त्यावर कुणीही इतरांनी स्वत:चा हक्क सांगू नये असंही मिटकरी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT