Devendra Fadnavis, Amruta Fadnavis
Devendra Fadnavis, Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

अमृता फडणवीसांनी वाय प्लस सुरक्षा स्वीकारली पण व्हॅन नाकारली

सरकारनामा ब्युरो

Amruta Fadanvis Y Plus Security news मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांना नुकतीच वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती. पण राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

अमृता फडणवीस आता जिथेही प्रवास करतील तिथे ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल त्यांच्यासोबत असेल. वाय प्लस सुरक्षेमध्ये अमृता फडणवीस यांच्या दिमतीला एक एस्कॉर्ट व्हॅन आणि पाच पोलीस कर्मचारी असतील. चोवीस तास पोलीस सुरक्षा ही असेल. तर ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल ही पायलट व्हॅनप्रमाणे काम करेल. त्यामुळे अमृता फडणवीस प्रवास करताना संबंधित परिसरातील रस्ता मोकळा केला जाईल. मात्र अमृता फडणवीस यांनी वाय प्लस सुरक्षा स्वीकारली असली तरी त्यांनी ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल नाकारले आहे.

''मुंबईत मला सामान्य नागरिक म्हणून जगायचं आहे. मुंबई आधीच वाहतुक कोंडींची मोठी समस्या आहे, पण मला विश्वास आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या विकास प्रकल्पातून आणि पायाभूत सुविधांमधून आपल्याला लवकरच या वाहतुक कोडींच्या समस्येतून सुटका मिळेल. त्यामुळे मला ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल दिले जाऊ नये.'' असे ट्विट करत अमृता फडणवीसांनी ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल घेण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीसांनी वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली नव्हती. पण त्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. पण अमृता फडणवीसांनीही मुंबई पोलिसांना आपल्याला ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलकची गरज नसल्याचे सांगितल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT