Devendra Fadnavis News, Amrita Fadnavis News, Eknath shinde news sarkarnama
मुंबई

शिंदेंना भेटण्यासाठी फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर पडायचे : अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

"फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही, हे मला माहित होतं," असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

सरकारनामा ब्युरो

नागपूर :महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या गुप्त भेटीबाबत अनेक चर्चा रंगल्या. याबाबत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis)यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्या नागपूर येथे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या. (amruta fadnavis latest news)

सत्तासंघर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांची गुजरातमध्ये मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा होती. या भेटीदरम्यान गृहमंत्री अमित शहा सुद्धा उपस्थित होते, अशीही माहिती आहे. फडणीस यांनी या काळात पाच-ते सहा वेळा दिल्ली वारी केली होती.

एकदा भेटीसाठी देवेंद्र फडणवीस मुंबईतून तर एकनाथ शिंदे मध्यरात्री गुवाहाटीतून आले होते. भाजपसोबत आल्यास सत्तास्थापनेचा कायदेशीर बाजू कशी मांडायची? याबाबत भेटीत चर्चा झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.ही भेट एका रात्री बडोद्यात झाल्याचं बोललं जात आहे. या भेटीमुळं सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आल्याचं दिसून आले. (Devendra Fadnavis News)

विधानभवनात दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत गुप्त भेटी झाल्याचे सांगितले आहे. त्यावर अमृता फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे. "शिंदे-फडणवीस उत्तम काम करतील,' असा विश्वास अमृता फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

"फडणवीस रात्री उशीरापर्यंत काम करतात, त्यामुळे माझ्या लक्षात आले नाही, पण कधी-कधी ते रात्री उशीरा वेशांतर करुन बाहेर पडायचे, मलाही त्यांना ओळखणे कठीण जायचे.मी विचारले तर विषय टाळायचे, पण माझ्या लक्षात आले होते की काही तरी सुरु आहे," असे त्या म्हणाल्या.

"एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार हे शिवसेनेवर नाराज होते. ही नाराजी बाहेर पडणार होती, त्यांना बळ देण्याचे, त्यांच्या पाठिमागे उभं राहण्याचं काम भाजपनं केलं," असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

"राजकारण सोडून देवेंद्र फडणवीस हे समाजसेवाही करु शकतात, याची मला जाणीव आहे, ही जाणीव नागरिकांना झाल्याने जनतेत फडणवीस यांची प्रतिमा उंचावली आहे," असे त्या म्हणाल्या. "फडणवीस हुडी घालून बाहेर पडायचे, ते मुख्यमंत्री होणार नाही, हे मला माहित होतं," असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

"देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाही, याबाबत मला गर्व वाटत होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले, तसेच मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना कोणताही फरक पडणार नव्हता," असे अमृता फडणवीस म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT