Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावर अमृता फडणवीस पहिल्यांदाच बोलल्या...

एस.टी. कामगारांनी विलीनीकरणाची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला केला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ला प्रकरण चांगलंच गाजत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. याप्रकरणी एस.टी. (ST) कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते कोठडीत आहेत. या हल्ल्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई भाजपच्या चित्रपट, नाट्य आघाडीतर्फे रविवारी महारोजगार मेळावा आयोजित केला होता. यावेळी अमृता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याबाबतही मतं व्यक्त केले. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचे कोणीही समर्थन करणार नाही. पण अशा घटना घडण्यामागे नेमकं कारण काय आहे, याचाही शोध घ्यायला हवा, असं फडणवीस म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकार हे केवळ राज्यातील किंवा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही. कामगारांचे हाल होत असताना सरकारने त्यांना मदत देणे अपेक्षित होते. पण सरकारने तसं केलं नाही. हे सरकार कमालीचं उदासीन आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

महाविकास आघाडी सरकार हे केवळ राज्यातील किंवा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. मागील पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही. कामगारांचे हाल होत असताना सरकारने त्यांना मदत देणे अपेक्षित होते. पण सरकारने तसं केलं नाही. हे सरकार कमालीचं उदासीन आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. (Silver Oak attack case news updates)

दरम्यान, पवारांच्या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. पवारांच्या घरावर हल्ला करणारे 110 एसटी कामगार न्यायालयीन कोठडीत आहेत. याचबरोबर काही पत्रकारही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कारण हल्ला घडला त्यावेळी पत्रकारही हजर होते. त्यामुळे त्यांना आधीच हल्ल्याची पूर्वकल्पना होती, असा दावा केला जात आहे. त्यांना हल्ल्याची माहिती आधीच कोठून मिळाली, याची चौकशी पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT