Devendra Fadnavis, Amruta Fadnavis
Devendra Fadnavis, Amruta Fadnavis Sarkarnama
मुंबई

असल्या मंडळींमुळंच सत्तेत यायला उशीर झाला! फडणवीसांनी दाखवलं पत्नीकडं बोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : सोशल मीडियात सतत महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकार आणि नेत्यांवर आसुड ओढणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविषयीचं एक गुपित समोर आलं आहे. सध्या राजकारणावर थेट भाष्य करणाऱ्या अमृतावहिनींचं लग्नाआधी मतदारयादीतही नाव नव्हतं. त्यांना आमदार, नगरसेवक म्हणजे काय, हेही माहित नव्हतं. खुद्द त्यांनीच एका कार्यक्रमात ही कबुली दिली. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आपली नाराजी व्यक्त केली.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फडणवीस पती-पत्नी एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमात त्यांनी कौटुंबिक व राजकीय विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. कधी राजकीय कोट्या तर कधी गुगली टाकत दोघांनी काही गौप्यस्फोटही केले. आक्रमक भाषणांनी घायाळ करणारे फडणवीस लग्नापुर्वी एवढ आक्रमक नव्हते, असं दोघांच्या विवाहाच्या गप्पा सुरू झाल्यानंतर अमृता फडणवीस यांनीच सांगितलं.

त्या म्हणाल्या, 'न बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या प्रेमात पडले होते. ते बाहेरच बोलतात. लग्नानंतर बोलती बंद झाली.' त्यावर फडणवीसांनीही लगेच 99 टक्के पती असे असतात, त्यांची बोलती बंद असते. एक टक्के असतात, त्यांना वेगळं व्हावं लागतं, असा पलटवार केला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील, असं बिल्कुल वाटलं नव्हतं. कारण राजकारणाबाबत लग्नाआधी काहीच ज्ञान नव्हतं, असंही अमृतावहिनींनी सांगितलं.

माणूस चांगला आहे. मला पूर्ण स्वातंत्र्य मिळेल. माझ्या आईचं घर बाजूलाच आहे, या गोष्टी लक्षात ठेवून लग्न केलं होतं. आमच्या घरी कोणालाच आमदार म्हणजे का, हे माहिती नव्हतं. लग्नानंतर मतदान कार्ड बनवलं, अशी कबुलीही त्यांनी दिली. ही चांगली गोष्ट नाही, तुम्ही राजकीयदृष्ट्या सजग असायला हवे. ही आपली जबाबदारी आहे. पण आम्ही तसे होतो. हे सांगताना मला वाईटही वाटतंय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

फडणवीस यांनीही त्याला दुजोरा दिला. 'त्यांना आमदार, नगरसेवक माहिती नव्हते. लग्नानंतर मतदारयादीत मी नावं घातली. त्यानंतर यांनी मतदान सुरू केलं. असल्या मंडळीमुळचं आम्हाला सत्तेत यायला उशीर झाला. ही सगळी आम्हाला मतं देणारी आहेत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT